विरोधकांना 'सर्वोच्च' धक्का..! ५० टक्के ईव्हीएम - व्हीव्हीपॅट पडताळणीची याचिका फेटाळली - counting of votes
मागील महिन्यात न्यायालयाने निवडणूक आयोगाला मतमोजणीसाठी ईव्हीएमसह व्हीव्हीपॅट स्लिपची पडताळणी प्रत्येक मतदारसंघात एका मतदान केंद्राऐवजी ५ मतदान केंद्रांवर करावी, असे निर्देश दिले होते. मात्र, ५० टक्के स्लिपच्या पडताळणीचे आदेश देण्यास न्यायालयाने तेव्हाही नकार दिला होता.
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन) आणि व्हीव्हीपॅट स्लिपच्या पडताळणीसंबंधीची विरोधी पक्षांची याचिका फेटाळली आहे. एकंदर २१ विरोधी पक्षांनी याचिका दाखल केली होती. निवडणूक आयोगाने ५० टक्के व्हीव्हीपॅट स्लिप आणि ईव्हीएमच्या पडताळणीची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने याविषयात आपण दखल देणे योग्य ठरणार नाही, असेही म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा आधीचा आदेश