नवी दिल्ली - 'दर शंभर वर्षांनी महामारी येते. कलियुगात आपण विषाणूचा सामना करू शकत नाही. मानवाची दुर्बलता यातून दिसून येते. तुम्ही सर्व प्रकारचे शस्त्रे तयार करू शकता, मात्र, विषाणूशी तुम्ही लढू शकत नाही. असा परिस्थितीला आपण आपल्या स्तरावर लढा दिली पाहिजे, कोरोना विषाणूच्या प्रसारावर असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी व्यक्त केले आहे.
फक्त सरकारने नाही तर आपण सर्वांनी कोरोनाशी लढा दिला पाहिजे. जर आपण वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केले तर आपण यशस्वी होऊ, असे न्यायाधीश मिश्रा म्हणाले.
तर न्यायाधीश एम. आर शहा यांनी वकीलांना आणि बार असोशिएशनला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता बाळगण्यास सांगितले. वरिष्ठ वकिलांनी फक्त एका वकिलाला बरोबर घेऊन न्यायालयात यावे. जर पाच सहा जणांनी न्यायालयात येयेणे टाळावे, हे आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी गरजेचे असल्याचे शहा यांनी वरिष्ठ वकील आर्यमान सुंदरम यांना सांगितले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भारतातील कोरोना रुग्णांची अद्ययावत यादी जाहीर केली आहे. त्यानुसार आत्तापर्यंत १४७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण झाले आहे. १२२ भारतीय नागरिकांचा तर २५ परदेशी नागरिकांचा यामध्ये समावेश आहे.