महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अनिल अंबानींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, पैसे भरा नाहीतर तुरुंगात जावे लागेल - सर्वोच्च न्यायालय

न्यायमूर्ती रोहिंन्टन फाली नरिमन आणि न्यायमूर्ती विनीत शरण यांनी न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी या तिघांनाही प्रत्येकी १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंडाची रक्कम न्यायालयाच्या कार्यालयात १ महिन्याच्या आत न भरल्यास या तिघांना १ महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागेल, असे न्यायालयाने सुनावले आहे.

अनिल अंबानी

By

Published : Feb 20, 2019, 1:11 PM IST

नवी दिल्ली - रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी आणि अन्य २ संचालकांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. २ न्यायमूर्तींच्या पीठाने अनिल अंबानी, सतीश सेठ आणि छाया विराणी यांना ४ आठवड्यांच्या आत एरिक्सन कंपनीला ४५३ कोटी चुकते करण्याचे आदेश दिले आहेत. असे न केल्यास त्यांना ३ महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागेल, असे न्यायालयाने सुनावले आहे.

टेलीकॉम उपकरणांची निर्मिती करणाऱ्या एरिक्सन कंपनीने अंबानी यांच्याविरोधात ५५० कोटींची थकीत रक्कम न भरल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या तीन अवमानना याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी निर्णय दिला. या प्रकरणी न्यायमूर्ती रोहिंन्टन फाली नरिमन आणि न्यायमूर्ती विनीत शरण यांनी अंबानी आणि त्यांच्या २ संचालकांना न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचे म्हटले आहे. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी या तिघांनाही प्रत्येकी १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंडाची रक्कम न्यायालयाच्या कार्यालयात १ महिन्याच्या आत न भरल्यास या तिघांना १ महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागेल, असे न्यायालयाने सुनावले आहे.


न्यायालयाच्या आदेशानंतर रिलायन्स कम्युनिकेशच्या प्रवक्त्याने आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत असून, त्यांच्या आदेशानुसार इतर बाबींचीही पूर्तताकरू, असे म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details