नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाने थैमान घातले असून रुग्ण संख्येत वाढ होत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. मात्र, काही आरोग्य कर्माचाऱ्याचे वेतन थकीत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासंदर्भातील याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढली. संबधित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालय विचार करत आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली - सर्वोच्च न्यायालय
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासंदर्भातील याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढली. संबधित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालय विचार करत आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं.
दिल्ली उच्च न्यायालयाने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासंदर्भातील माध्यमांच्या अहवालाची दखल घेतली आहे, असे न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटलं. तसेच याचिकाकर्त्याचे वकिल के. वी. विश्वनाथन यांनी न्यायालयासमोर आशा कर्मचाऱ्याचा मुद्दा उपस्थित केला.
सर्वोच्च न्यायालयाने आरुषी जैन यांच्या याचिकेवर सुनावणी केली. केंद्राच्या 15 मेच्या निर्णयावर आरुषी जैन यांनी प्रश्न उपस्थित केले होते. फिजिशियन डॉक्टरांना 14 दिवस क्वारंटाईन करणे गरजेचे नाही, असे त्यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे. तसेच त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासंदर्भातील मुद्दाही न्यायालयात उपस्थित केला.