चारा घोटाळ्यातील दोषी लालू प्रसाद यांच्या जामीनाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
'लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय प्रचारात सहभाग घेण्यासाठीच लालू प्रसाद यांनी जामीन हवा आहे. तब्येत ठीक नसणे किंवा उपचारांसाठी जामीन मागणे हा जामीन मागण्यासाठी केलेला बहाणा आहे,' असे सीबीआयने म्हटले आहे.
नवी दिल्ली - करोडोंच्या चारा घोटाळ्यातील दोषी आणि राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या जामीनाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. लालू प्रसाद यांनी तब्येत ठीक नसल्याच्या कारणावरून जामीन मागितला होता. सीबीआयने या जामीनाला विरोध केला आहे.
'राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख असलेल्या लालू यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जामीन मागितला आहे. ११ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय प्रचार आणि इतर कार्यक्रमांत सक्रिय सहभाग घेण्यासाठीच लालू प्रसाद यांनी जामीन हवा आहे. तब्येत ठीक नसणे किंवा उपचारांसाठी जामीन मागणे हा जामीन मागण्यासाठी केलेला बहाणा आहे,' असे सीबीआयने म्हटले आहे.