महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बंगालमध्ये भाजपला पुन्हा दणका, लाऊडस्पीकरवर सर्वोच्च न्यायालयच म्हणाले खामोश.. - Ranjan Gogoi

फेब्रुवारी, मार्च महिन्यात विद्यार्थ्यांच्या परिक्षा असल्याने लाऊडस्पीकरवर बंदी आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयाविरोधात न्यायाधीश मुकुल रोहतगी यांनी आवाज उठवला होता.

सर्वोच्च न्यायालय

By

Published : Feb 11, 2019, 9:22 PM IST

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये भाजपला सर्वोच्च न्यायालयाने आणखी एक दणका दिला आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणाऱ्या सभांसाठी लाऊडस्पीकरची परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी भाजपने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली.

फेब्रुवारी, मार्च महिन्यात विद्यार्थ्यांच्या परिक्षा असल्याने लाऊडस्पीकरवर बंदी आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयाविरोधात न्यायाधीश मुकुल रोहतगी यांनी आवाज उठवला होता. मात्र, न्यायाधीश रंजन गोगोई आणि संजीव खन्ना यांनी मुकुल रोहतगींचा लोकांपर्यंत पोहचणे हा राजकीय पक्षांचा मूलभूत अधिकार असल्याचा दावाही फेटाळून लावला. यापूर्वी कोलकाता उच्च न्यायालयानेसुद्धा रोहतगींची ही याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला होता.


ABOUT THE AUTHOR

...view details