नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय न्यायाधीशांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या बैठकीत पूर्वीप्रमाणे न्यायालयाचे कामकाज सुरू करण्यावर चर्चा झाल्याचे सर्वोच्च न्यायालयातील वकिलांच्या संघटनेने (स्कोरा) म्हटले आहे.
तीन न्यायालयाचे कामकाज सुरू करण्यावर न्यायाधीशांची समिती गांभीर्याने विचार करत आहे.
त्या दरम्यान कार्यालयाकडून न्यायालयाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी आवश्यक ते पावले उचलण्यात येणार आहेत.
वकिलांची संघटना स्कोराचे अध्यक्ष शिवाजी एम. जाधव आणि सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकिल दुष्यंत दवे यांनी पूर्वीप्रमाणे न्यायालयाचे कामकाज लवकरात लवकर सुरू करण्याची न्यायाधीशांच्या समितीला विनंती केली आहे. त्यासाठी कोरोनाच्या महामारीत वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेवून उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सूचविले आहे.
प्रत्यक्ष न्यायालय सुरू झाल्यानंतर लोकांना सुनावणीसाठी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहण्याचा पर्याय असावा, असेही वकिलांची संघटनेने म्हटले आहे. त्याबाबत एक ते दोन दिवसात
न्यायाधीशांची समिती निर्णय घेणार आहे. दरम्यान, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज हे ऑनलाईन पद्धतीने होत आहेत.