नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणावर ६ मेपूर्वी निर्णय द्यावा, अशी सूचना देत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारले आहे.
मोदी, शाहंवरील आरोपांवर ६ मेपर्यंत निर्णय घ्या, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारले - election
काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्यावरही कारवाई केली नाही, असे या याचिकेत सांगण्यात आले आहे.
काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्यावरही कारवाई केली नाही, असे या याचिकेत सांगण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंग केल्याच्या विरोधात कारवाई न केल्याने आम्हाला न्यायालयात यावे लागले असल्याचे काँग्रेसचे वकील मनु संघवी यांनी सांगितले.
काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात आचारसंहितेचा भंग केल्याच्या नऊ तक्रारी दाखल केल्या आहेत. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी प्रचार करताना भडकाऊ भाषण दिले. सैन्याने केलेल्या कारवाईचा वापर मते घेण्यासाठी केला. तसेच मतदानादिवशी रॅली काढली, असे आरोप काँग्रेसने केले आहेत.