नवी दिल्ली - बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात चमकीच्या (मेंदूज्वर) आजारामुळे आतापर्यंत ११२ मुलांचा मृत्यू झाला आहे. या विषयी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. मनोहर प्रताप आणि सनप्रीत सिंह अजमानी या २ वकिलांनी ही याचिक दाखल केली आहे. २४ जूनला याप्रकरणी सुनावणी होणार आहे.
या जनहित याचिकेत केंद्र आणि राज्य सरकारला ५०० अतिदक्षता विभागांची (आय.सी.यु.) व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यासोबतच अॅक्युट इन्सेफऍॅलिटीस सिंड्रोम (मेंदूज्वर, स्थानिक नाव चमकी) या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी डॉक्टरांची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे. तसेच मुझफ्फरपूर येथे १०० मोबाईल आय.सी.युची निर्मीती करून तेथे स्वतंत्र मेडिकल बोर्डाची स्थापना करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
मनोहर प्रताप आणि सनप्रीत सिंह अजमानी या २ वकिलांनी ही याचिक दाखल केली आहे. दरम्यान, या घटनेला जबाबदार धरत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबै आणि बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडे यांच्या विरोधात मुझफ्फरपूर न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर येत्या २६ जूनला सुनावणी होणार आहे.
मनोहर प्रताप आणि सनप्रीत सिंह अजमानी या २ वकिलांनी ही याचिक दाखल केली होती. या आजाराने एवढे गंभीर रूप धारण केलेले असताना मुख्यमंत्री नितीश कुमार तब्बल १८ दिवसांनी भेट देण्यास पोहोचल्याने त्यांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. रुग्णालयात मेंदूज्वराने आजारी मुलांवर नीट उपचार करण्यात येत नाहीत. तसेच, बनावट औषधे पुरवण्यात येत आहेत. रोज मुलांचा मृत्यू होत आहे. नितीश कुमार यांना आता जाग आली आहे. त्यांनी परत जावे, अशी संतप्त प्रतिक्रिया रुग्णाच्या एका नातेवाईकाने दिली. यापूर्वी विरोधकांनीही त्यांना लक्ष्य केले होते. तसेच काळे झेंडे दाखवत 'चले जाव' नारे दिले गेले.