नवी दिल्ली :पत्रकार विनोद दुवा यांच्यावरील खटल्याची अंतिम सुनावणी १० ऑगस्टला होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत आदेश देत आजची सुनावणी तहकूब केली. केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या एका यूट्यूब व्हिडिओ संदर्भात शिमला पोलिसांनी दुवांविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल केला होता.
न्यायमूर्ती उदय ललित यांच्या खंडपीठाने १० ऑगस्टला दुपारी २ वाजता या खटल्याची अंतिम सुनावणी होणार असल्याचे सांगितले. यापूर्वी त्यांना अटकेपासून असलेले संरक्षण हे सर्वोच्च न्यायालयाने १५ जुलैपर्यंत वाढवले होते. यासोबतच, या प्रकरणाच्या चौकशीसाठी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना उत्तर देणे हे दुवांना बंधनकारक नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.