नवी दिल्ली - मद्य सम्राट विजय मल्ल्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या फेरयाचिकेला न्यायालयाने 20 ऑगस्टपर्यंत स्थगित केली आहे. न्यायालयाचा अपमान केल्याप्रकरणी विजय मल्ल्याला दोषी धरण्यात आले आहे. या निर्णयाचा फेरविचार करण्याबाबत याचिका न्यायालयात दाखल होती.
न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जात मल्ल्याने आपल्या मुलांना पैसे हस्तांतर केले होते. पैसे हस्तांतर करण्यास न्यायालयाची मनाई होती. त्यामुळे न्यायालयाचा अपमान केल्याचा निर्णय दिला होता. याविरोधात मल्याने फेर याचिका दाखल केली होती. मागील 3 वर्षांपासून मल्ल्याने दाखल केलेली याचिका संबंधित न्यायालयापुढे सुनावणीला का घेण्यात आली नाही, याचे स्पष्टीकरण न्यायालयाने आपल्या रजिस्ट्री कार्यालयाकडे मागितले आहे.