अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाने पोटातील अल्सर टाळण्यासाठी दिले जाणारे रॅनिटिडाईन हे औषध दुकानांमधून त्वरित काढून घेण्याचा आदेश दिला आहे. या औषधाच्या वापराने कर्करोग होऊ शकतो, असे अलिकडच्या संशोधनात आढळल्याने, एफडीएने औषध दुकानांना असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. सध्याच्या घडीला, रॅनिटिडाईनवर बंदी घातलेली नाही, पण त्याचे उत्पादन आणि पुरवठा थांबवण्यास औषध कंपन्यांना सांगितले आहे. या औषधामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या धोक्याबाबत जनतेला स्पष्टपणे कळवण्यात आले आहे. भारतीय औषध महानियंत्रक याचप्रकारची कारवाई करतील, असा संबंधित अधिकाऱ्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
रॅनिटिडाईनच्या वापराविरूद्ध यूएसएफडीएच्या आदेशाचे मुख्य कारण, झॅंटॅक या ब्रँडखाली ते विकले जाते; ज्यात एन-नायट्रोसो डायमेथिलअमाईनचे (किंवा थोडक्यात एनएमडीए, कार्सिनोजेनिक पदार्थ) अंश त्यात आढळले हे आहे. दीड वर्षांपूर्वी, यूएसएफडीएने रॅनिटिडाईनचा पुरवठ्याचे कार्सिनोजेनिकचे अंश आढळल्याने नियमन केले होते. त्यानंतर, एनएमडीए परवानगी दिली आहे, त्या प्रमाणात असेल तर औषध वापरता येईल, अशी मोकळीकही दिली होती. पण सध्याची कारवाई संपूर्ण वेगळी आहे. अलिकडे केलेल्या चाचण्यांमध्ये असे आढळले आहे, की औषधात दिवसेंदिवस एनएमडीएची मात्रा वाढतच गेली. औषधाचे वय निश्चित करता येत नसल्याने, एफडीएने रॅनिटिडाईनचा वापर थांबवणे चांगले, असे स्पष्ट केले. त्यामुळे आता औषध कंपन्यांना रॅनिटिडाईनचा पुरवठा थांबवण्यास सांगितले आहे.
सर्व जगभरातील औषध नियामक संस्था यूएसएफडीएने घालून दिलेल्या नियमांचे पालन करतात. स्थानिक औषध उद्योग डीसीजीआयच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत. पूर्वी जेव्हा यूएसएफडीएने रॅनिटिडाईनमध्ये कार्सिनोजेनिक पदार्थाचे अंश असल्याचे ठोसपणे सांगितले होते, तेव्हा डीसीजीआय यांनी स्थानिक औषध कंपन्यांना त्यांचे निष्कर्ष सादर करण्यास सांगितले होते. देशांतर्गत औषधी कंपन्या सध्या जागतिक बाजारपेठांमध्ये विशेषतः अमेरिकेत औषधाची निर्यात करत आहेत.