महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काँग्रेस पक्षाचा 28 डिसेंबरला  ‘संविधान बचाओ- भारत बचाओ’ मोर्चा

काँग्रेसकडून पक्षाच्या स्थापना दिनी म्हणजेच २८ डिसेंबर ला देशभरामध्ये ‘संविधान बचाओ- भारत बचाओ’ मोर्चा काढण्यात येणार आहे.

काँग्रेस
काँग्रेस

By

Published : Dec 18, 2019, 9:46 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेसकडून पक्षाच्या स्थापना दिनी म्हणजेच २८ डिसेंबर ला देशभरामध्ये ‘संविधान बचाओ- भारत बचाओ’ मोर्चा काढण्यात येणार आहे. पक्षाचे अध्यक्ष आणि विविध आघाड्यांचे प्रमुख देशातील विविध राज्यांच्या राजधानींमध्ये आयोजित मोर्चांमध्ये भाग घेतील, अशी माहिती काँग्रेस महासचिव के.सी वेणुगोपाल यांनी दिली.

भारत बचाओ रॅली यशस्वी झाल्यानंतर विविध राज्यात असे मोर्चे आयोजित करण्याचे ठरवण्यात आले. 16 डिसेंबर रोजी काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रभारी यांच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या दिवशी पक्षाचा झेंडा फडकवतील.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या विरोधात तीव्र विरोध नोंदवणे हाच या मोर्चाचा हेतू आहे. मोदी सरकारच्या लोकविरोधी धोरणांमुळे बेरोजगारी वाढली असून आर्थिक मंदी आल्याचे वेणुगोपाल म्हणाले.काँग्रेसची स्थापना २८ डिसेंबर १८८५ मध्ये ब्रिटिश राजाच्या काळी झाली होती. एलेन ओक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी स्थापन केली. मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील 72 प्रतिनिधी एकत्र येऊन 28 डिसेंबर 1885 रोजी 'इंडियन नॅशनल काँग्रेस' म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. काँग्रेस याचा अर्थ संघटना असा होतो.


हेही वाचा -'भाजप सरकार प्रचार करण्यात सुपरहीरो मात्र, कामात सुपर सुपरझिरो', प्रियंका गांधींचा हल्लाबोल


आजही काँग्रेसला मानणारा मोठा जनसमूह भारतामध्ये आहे. गांधी आणि नेहरू घराण्याची परंपरा लाभलेल्या काँग्रेस पक्षाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर देखील देशाच्या राजकारणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे.महत्त्वाच्या राष्ट्रीय पक्षांमध्ये काँग्रेस पक्षाचे स्थान कायम आहे.

हेही वाचा -उर्दू लेखक मुजतबा हुसैन पद्मश्री पुरस्कार करणार परत

ABOUT THE AUTHOR

...view details