वॉशिंग्टन डी. सी- नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभरातील वातावरण ढवळून निघाले असताना मायक्रोसॉफ्टचे सीईओ आणि मुळचे भारतीय असलेले सत्या नाडेला यांनी निर्वासितांच्या प्रश्नावर वक्तव्य केले आहे. सीएए कायद्यावरून भारतात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून त्यांनी दुख: व्यक्त केले.
'भारतात जे काही घडतंय ते वाईट आहे. भारतात आलेल्या बांगलादेशी निर्वासित इन्फोसीस कंपनीचा सीईओ झालेला किंवा काहीतरी मोठं करून दाखलेलं, मला पाहायला आवडेल. त्यांचीही स्वप्न पूर्ण व्हावीत. मी अमेरिकेत निर्वासित म्हणून आलो, जे माझ्या सोबत झालं तसेच बांगलादेशींसोबत भारतात व्हावे, असे नाडेला म्हणाले. प्रत्येक देशाने आपल्या सीमारेषा ठरवायला हव्या, देशाचं संरक्षण करायला हवं, तसेच निर्वासितांबाबत धोरण आखायला हवे. लोकशाही देशांमधील जनता आणि सरकारांनी यावर मळून निर्णय घ्यायला हवा. बहुसंस्कृती असलेल्या भारतात माझी जडणघडण झाली. त्यानंतर निर्वासित म्हणून मी अमेरिकेत आलो. येथील माझ्या अनुभवावरून भारतातील निर्वासितांचेही स्वप्न पूर्ण व्हायला हवे, निर्वासिंतांनी एखादी नवा उद्योग सुरू केलेला किंवा एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीची धुरा सांभाळावी, अशी मला आशा आहे. त्याचा भारतीय समाज आणि भारतीय अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल, असे नाडेला म्हणाले.