सतना- देशावर सध्या कोरोनासारख्या महामारीचे संकट ओढावले आहे. अशात या परिस्थितीवर मात करण्यासाठी पोलीस आणि डॉक्टरांसह अनेक लोक योगदान देत आहेत. यात मध्यप्रदेशच्या सतनाची कन्या डॉ ज्योती जायसवाल यांचाही समावेश आहे. त्या कोरोनासोबत लढण्यासाठी आपल्या घरापासून दूर इंदौरमध्ये काम करत आहेत.
लोकांच्या सेवेसाठी हे क्षेत्र निवडले, आज देशाला माझी गरज...डॉक्टरचे वडिलांना उत्तर - महामारीचे संकट
मध्यप्रदेशच्या सतनाची कन्या डॉ ज्योती जायसवाल कोरोनासोबत लढण्यासाठी आपल्या घरापासून दूर इंदौरमध्ये काम करत आहेत. रुग्णांची सेवा करणे हा आपला धर्म असल्याचे सांगत ज्योतीने स्वतःला या कामासाठी समर्पित केले आहे. यासोबतच घरी जाण्यासही नकार दिला आहे.

इंदौरच्या अरबिंदो रुग्णालयात त्या सध्या कार्यरत आहेत. येथील अतिदक्षा विभाग तसेच आयसोलेशनमधील रुग्णांची त्या देखरेख करत आहेत. ज्योतीने एमबीबीएस आणि त्यानंतर टीबी तसेच चेस्ट मेडिसीनमध्ये एमडी केलं आहे. रुग्णांची सेवा करणे हा आपला धर्म असल्याचे सांगत ज्योतीने स्वतःला या कामासाठी समर्पित केले आहे. यासोबतच घरी जाण्यासही नकार दिला आहे.
डॉ. ज्योती यांचे वडिल मुकेश यांनी सांगितले, की ज्योतीला आम्ही घरी परत येण्यास म्हटले होते. मात्र, मी लोकांच्या सेवेसाठीच हे क्षेत्र निवडले असल्याचे सांगत तिने घरी येण्यास नकार दिला. आज देशाला तिची गरज आहे, अशात ती घरी कशी येऊ शकते. पुढे मुकेश म्हणाले, की ज्योती सध्या या रुग्णालयातील 42 रुग्णांची देखरेख करत आहे. दिवसात तिच्यासोबत एकदाच फोनवर बोलणे होते. आपल्या मुलीवर आपल्याला गर्व असल्याचे त्यांनी सांगितले.