नवी दिल्ली -गाजियाबादमधील वाल्मीकी समाज बांधवांकडून बौद्ध धर्म स्वीकारण्याचा मुद्द्याला आता राजकीय स्वरुप आले आहे. या विषयावरुन आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदियनाथ यांच्यावर राज्यात जातीय दंगली घडवण्याचा आरोप केला आहे.
'बलात्काऱ्यांना सरकारकडून वाचविण्याचा प्रयत्न'
संजय सिंह यांनी या पत्रात लिहिले आहे, की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून जातीय दंगली घडविण्याचे षड्यंत्र रचण्याचा प्रयत्न केला जात आहे. यूपीमध्ये विशेषता जाटव आणि वाल्मीकि समाज बांधवाविरुद्ध हिंसक घटना जास्त प्रमाणात घडत आहेत, याचवेळी दलित समाजातील महिलांवर सातत्याने बलात्कार होत आहेत. या घटनेतील आरोपींवर कारवाई करण्या ऐवजी सरकार त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे.