लखनौ - अयोध्येतील रामजन्मभूमीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ७ मार्चला येणार आहेत. याआधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अयोध्येचा दौरा करत तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ईटीव्ही भारतशी खास चर्चा केली. तसेच महाराष्ट्रातील राजकारणाबरोबरच भाजप शिवसेनेबरोबरच्या संबंधावरही त्यांनी मत व्यक्त केले. शिवसेनेचे आणि भाजपचे नाते तुटले असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमडळ अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शन घेण्यास येणार आहेत. प्रभू रामचंद्रांच्या कृपेने महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार बनले आहे. त्यामुळे अयोध्येत येऊन रामलल्लाचे दर्शन घेण आमचे कर्तव्य आहे. यामागे कोणतेही राजकारण नाही.
शिवसेनेचं भाजपबरोबरचं नातं तुटलेलं आहे
संजय राऊत अयोध्या दौऱ्यावर ईटीव्ही प्रतिनिधीशी चर्चा करताना राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये ताळमेळ कमी असल्याच्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, आम्ही राज्यात सरकार चालवत आहोत. केंद्र त्यांचे सरकार चालवत आहे. आम्ही एनडीएमधून बाहेर पडलो असून भाजपबरोबरचं नात्यात दुरावा निर्माण झाला नसून ते तूटले आहे. भाजप महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष आहे.
शिवसेना हिंदूत्व कधीही सोडणार नाही
सीएए एनआरसीवरून विचारलेल्या प्रश्नालाही राऊतांनी उत्तर दिले. 'शिवसेनेच्या भूमिकेत कधीही बदल होणार नाही. विषय हिंदूत्वाचा असो किंवा कोणताही, आम्ही आमच्या नियम आणि अटींवर सरकार बनवले असून किमान समान कार्यक्रम (कॉमन मिनिमम प्रोग्राम) हा सरकारचा आधार आहे, धार्मिक मुद्दा आधार नाही. रोटी, कपडा, मकान, कायदा आणि सुव्यवस्था या मुद्द्यांवर सरकारचे लक्ष आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही भाजपच्या बरोबर आलो आहोत'.
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र मोठ राज्य असून शिवसेनेने कधीही कोणाची गुलामी केली नाही. अपमान सहन करून कधी कोणाशी हातमिळवणी केली नाही. कोणी जर शिवसेनेचा अपमान करत असेल तर मी सहन करणार नाही.
मंदिराचे बांधकाम साधू संताच्या हातून व्हायला पाहिजे
राम मंदिर ट्रस्टवर प्रश्न विचारला असता, संजय राऊत म्हणाले राम मंदिर ट्रस्ट राजकीय ट्रस्ट नाही. मंदिर बांधकाम साधू संतांच्या हातून व्हायला पाहिजे. नृत्य गोपाल दार ट्रस्टचे प्रमुख आहेत. पहिल्यांदा त्यांचे नाव यादीत नव्हते, तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटले होते. मात्र, नंतर त्यांचे नाव यादीत समाविष्ट करण्यात आला ही आनंदाची गोष्ट आहे.