महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'येणारं सरकार तीन पक्षांचं मिळून असेल आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल' - शिवसेना न्यूज

शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आणि ते नाव लवकरच शिवतीर्थावर समजेल. उद्धव ठाकरे यांनी राज्याचे नेतृत्व करावे ही आमच्यासह जनतेची इच्छा असल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले आहे.

संजय राऊत

By

Published : Nov 20, 2019, 10:00 PM IST

नवी दिल्ली- आघाडीची बैठक झाल्यावर पवारांची भेट घेणार असून मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीत दिली. तसेच येणारं सरकार हे तीन पक्षांचे मिळून असणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

संजय राऊत यांची प्रतिक्रिया

हेही वाचा -पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर पवारांनी केले टि्वट, म्हणाले...'शेतकऱ्यांच्या समस्यांवर मोदींशी केली चर्चा'

शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आणि ते नाव लवकरच शिवतीर्थावर समजेल. उद्धव ठाकरे यांनी राज्याचे नेतृत्व करावे ही आमच्यासह जनतेची इच्छा असल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच हे सरकार तीन पक्षांचे असून त्यासाठी तिन्ही पक्षांचे मिळून किमान समान वाटप कार्यक्रमावर चर्चा सुरू आहे. त्यासाठीची सर्व प्रक्रिया सध्या तिन्ही पक्षांमध्ये सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details