डेहराडून-कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात तसेच उत्तराखंडमध्ये जनजागृती अभियान राबवले जात आहे. सर्वसामान्य माणसांना तोंडाला मास्क बांधणे आणि सॅनिटायझरने हात धुवावेत अशा सूचना दिल्या गेल्या आहेत. मात्र, राज्याच्या आरोग्य विभागातील कर्मचारी आणि कार्यालयला भेट देणारे लोक यांना हात स्वच्छ करण्यासाठी लावण्यात सॅनिटायझर डिस्पेंसर रिकामे असल्याची बाब समोर आली आहे.
उत्तराखंडचा आरोग्य विभाग राज्यात सॅनिटायझर आणि मास्क वापरण्याचे आवाहन जनतेला करत आहेत. पण आरोग्य विभागाच्या कार्यालयात सॅनिटायझरच्या वापराबाबत निष्काळजीपणा दिसून आला.