महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'अल्कोहोलनं कोरोना 'निष्प्रभ' होतो, तर मद्याचं सेवन केल्यानेही नष्ट होईल' - Ashok Gehlot

देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे बाजारपेठा बंद असून फक्त अत्यवश्यक वस्तूचे दुकाने सुरु आहेत. राजस्थानमधील कोटा येथील आमदार भरतसिंह कुंदनकपूर यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना मद्यविक्रीची दुकानं सुरू करावी अशी मागणी करणारे पत्र लिहले आहे.

Telangana govt to home deliver mangoes amid lockdown
Telangana govt to home deliver mangoes amid lockdown

By

Published : May 1, 2020, 12:39 PM IST

नवी दिल्ली -कोरोना विषाणूचे संकट सर्वच देशांपुढे अधिक गंभीर होत चालले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे बाजारपेठा बंद असून फक्त अत्यवश्यक वस्तूचे दुकाने सुरु आहेत. राजस्थानमधील कोटा येथील आमदार भरतसिंह कुंदनकपूर यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना मद्यविक्रीची दुकानं सुरू करावी अशी मागणी करणारे पत्र लिहले आहे.

देशभरामध्ये मद्यविक्री बंद केल्याने राज्याच्या महसूलात घट होत आहे. मात्र, राज्यात काही ठिकाणी अवैधरित्या मद्यविक्री सुरु आहे. कोरोनाचा नाश करण्यासाठी अल्कोहोल असलेले सँनीटायझरचा वापर केला जातो. अल्कोहोलनं हात धुतल्यास करोनाचे विषाणू नष्ट होत असतील, तर मग मद्याचं सेवन केल्यास घशातीलही करोनाचे विषाणू नष्ट होतील. त्यामुळे राज्य सरकाराने मद्यविक्रीची दुकाने सुरु करावी, अशी मागणी भरतसिंह कुंदनकपूर यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details