महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'तर... शिवसेनेचं दुकान बंद करीन' बाळासाहेबांचा 'तो' व्हिडिओ भाजप नेत्याने केला शेअर - shivsena bjp fight

संबित पात्रा यांनी बाळासाहेबांच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियाांचा पाऊस पडत आहे.

बाळासाहेब ठाकरे
बाळासाहेब ठाकरे

By

Published : Dec 3, 2019, 3:00 PM IST

मुंबई - तब्बल महिनाभराच्या सत्तानाट्य़ानंतर राज्यामध्ये शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री पदासाठी अडून बसेलेल्या शिवसेनेने आपला जुना मित्र आणि वैचारिक सहकारी असलेल्या भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेत्तृत्त्वाखाली सरकार स्थापन केले. मात्र, शिवसेनेच्या या निर्णयावरून राज्यातील तसेच केंद्रातील भाजप नेते शिवसेनेवर चांगलेच खार खाऊन आहेत. भाजपचे प्रवक्ते संबीत पात्रा यांनी शिवसेनेला डिचवण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंचा एका जुना व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियाांचा पाऊस पडत आहे.

संबित पात्रा यांनी बाळासाहेबांच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. मी शिवसेनेची कधीही काँग्रेस होऊ देणार नाही. ज्या दिवशी असे होईल त्या दिवशी मी शिवसेना बंद करुन टाकील, मी माझ दुकान बंद करुन टाकील, असं बाळासाहेब ठाकरे म्हणताना दिसत आहेत. हा व्हिडिओ संबित पात्रा यांनी शेअर केला आहे. याबरोबरच बाळासाहेबांचे वक्तव्य कोट करत आता राहुल गांधीच शिवसेनेचं दुकान बंद करतील, असे कॅप्शन दिले आहे.या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांना चांगलेच खाद्य मिळाले आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत ३६ हजार लोकांनी लाईक केले आहे, तर १२ हजार जणांनी रिट्विट केला आहे. तर कमेंटमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या समर्थकांमध्ये जुंपलेली पहायला मिळत आहे. काही जण देवेंद्र फडणवीस यांच्या जुन्या व्हिडिओ शेअर करत भाजपला डिचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काश्मिरात भाजपने उपमुख्यमंत्री पदासाठी मेहबुबा मुफ्तींचे पाय धरल्याचे दाखले ट्विटरकर्ते देत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details