नवी दिल्ली - काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी पाकिस्तानच्या लाहोर लिटरेचर फेस्टिव्हलला संबोधित केले. त्यावरून भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. शशी थरुर यांनी भारताची अवहेलना केली आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय मंचावर भारताची वाईट प्रतिमा दर्शवण्याचा प्रयत्न केला, अशी टीका संबित पात्रा यांनी केली. संबित पात्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतच एक व्हिडीओ शेअर केला आहे.
'राहुल गांधी नाही, तर ते आता राहुल लाहोरी आहेत'
भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधींचा 'राहुल लाहोरी' असा उल्लेख केला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लवकरच पाकिस्तान राष्ट्रीय काँग्रेस होणार आहे, असेही पात्रा म्हणाले.
संबित पात्रा
राहुल गांधींना आता राहुल लाहोरी असे संबोधित करणार आहोत. थरूर यांनी पाकिस्तानमध्ये त्यांचा प्रचार केला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लवकरच पाकिस्तान राष्ट्रीय काँग्रेस होणार आहे, असे पात्रा म्हणाले.
भारत सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी झाल्याचे थरूर यांनी फेस्टिव्हलमध्ये म्हटलं. मात्र, असे नसून मोदींनी कोरोनाविरोधात उचलेल्या पावलांमुळे देशातील जनता संतुष्ट असल्याचे माध्यमांनी पोलद्वारे दर्शवले आहे, असे पात्रा म्हणाले.