नवी दिल्ली -भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओवरुन देशभरात त्यांच्यावर टीकेचा वर्षाव होत आहे. तर, या व्हिडिओमुळे मोदी सरकारने २०१६ साली आणलेल्या उज्वला योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी राजकीय पक्ष जसे जमेल तसे प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, भाजप नेते संबित पात्रांच्या अशाच एका प्रयत्नामुळे टीकेचे पात्र ठरले आहेत. पात्रांनी शनिवारी पुरी येथे एका कुटुंबाला भट दिली. त्यावेळी त्या कुटुंबीयांसोबत जेवतानाचा व्हिडिओ त्यांनी आपल्या ट्विटरवर प्रसिद्ध केला आहे. मात्र, त्या व्हिडिओत ती महिला चुलिवर जेवण बनवताना दिसत आहे. तर, जेवण बनवताना त्या महिलेच्या डोळ्यात पाणी आल्यामुळे ते पुसतानाही दिसत आहे.