महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भाजपचे चुकीचे धोरण आणि राजकारणामुळे देश आर्थिक संकटात - अखिलेश यादव - Akhilesh yadhav critisim on yogi aaditynath

समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि राजकारणामुळे देश आर्थिक संकटात सापडल्याचे ते म्हणाले.

अखिलेश यादव

By

Published : Sep 16, 2019, 8:18 AM IST

लखनौ -समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि राजकारणामुळे देश आर्थिक संकटात सापडल्याचे ते म्हणाले. सर्वच क्षेत्राला त्यांच्या चुकीच्या धोरणाचा फटका बसल्याचेही ते म्हणाले.

एकीकडे देशात मंदीचे वातावरण असताना भाजप सत्तेत येऊन १०० दिवस झाल्याचा उत्सव साजरा करत आहे. तसेच उत्तर प्रदेशचे सरकार हे महागाईवर नियंत्रण आणण्यात आणि रोजगार पुरवण्यात अपयशी ठरल्याचे अखिलेश यादव म्हणाले. तसेच या सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे यादव म्हणाले.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details