पंजाब- सॅम पित्रोदा यांनी १९८४ च्या शीख दंगलीबद्दल केलेले वक्तव्य योग्य नाही. त्यामुळे त्यांनी माफी मागायला हवी, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळेत आयोजित पत्रकार परिषदेत सॅम यांनी १९८४ च्या शीख दंगलीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावेळी त्यांनी, १९८४ मध्ये जे झाले ते झाले. परंतु, पाच वर्षांत तुम्ही काय केले? त्याबद्दल सांगा, असे म्हटले होते.