बैतुल (म.प्र)- कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. याचा फटका डोंगराळ भागातील नागरिकांना बसत आहे. लॉकडाऊनमुळे रेशन मिळणे अवघड झाल्याने नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही परिस्थिती लक्षात घेत, जिल्हा पोलिसांनी शाहपूर येथील अतिदुर्गम ठिकाणी वसलेल्य भंडारपाणी टेकडीवरील नागरिकांना रेशन पुरवठा केला आहे.
बैतुलमध्ये पोलीस जवान ठरले देवदूत; दुर्गम भागातील आदिवासींना केला अन्नधान्याचा पुरवठा
१८०० फिट उंची असलेल्या भंडारपाणी टेकडीवरील आदिवासी नागरिकांनी मदतीसाठी प्रशासनाला विनंती केली होती. त्यानंतर, पोलीस जवानांनी वन विभागाच्या मदतीने १०० किलो कनिक, ५० किलो तांदुळ, ५० किलो दाळ, २० किलो तेल आणि इतर खाद्य पदार्थ नागरिकांपर्यंत पोहोचवले.
दुर्गम भागातील नागरिकांसाठी खाद्य पदार्थ घेऊन जाताना पोलीस जवान
१८०० फिट उंची असलेल्या भंडारपाणी टेकडीवरील आदिवासी नागरिकांनी मदतीसाठी प्रशासनाला विनंती केली होती. त्यानंतर, पोलीस जवानांनी वन विभागाच्या मदतीने १०० किलो कनिक, ५० किलो तांदुळ, ५० किलो दाळ, २० किलो तेल आणि इतर खाद्य पदार्थ नागरिकांपर्यंत पोहोचवले. या वेळी आम्ही वेळोवेळी तुमची मदत करू, असे पोलिसांनी गावकऱ्यांना आश्वासन दिले. तसेच गावकऱ्यांनी देखील पोलिसांचे आभार मानले.
हेही वाचा-दिल्लीत परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी ड्रोनचा वापर