महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दारू दुकानात सेल्समन जळून ठार, कुटुंबाला खून झाल्याचा संशय - दारू दुकानात सेल्समनचा जळालेला मृतदेह

अलवारमध्ये दारूच्या दुकानात सेल्समनला जाळून जीवे मारल्याची घटना समोर आली आहे. दारूच्या दुकानात फ्रिझरमध्ये विक्रेत्याचा मृतदेह आढळला. मद्य कंत्राटदाराने त्याला जिवंत जाळल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

Salesman burned to death in liquor store
दारू दुकानात सेल्समन जळून ठार

By

Published : Oct 26, 2020, 2:50 PM IST

अलवर (राजस्थान) - खैरथल पोलीस ठाण्यांतर्गत कुंपूर गावात दारूच्या दुकानाला आग लागल्यामुळे सेल्समनचा जळून मृत्यू झाला. या युवकाला जिवंत जाळून मारण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

कमल किशोर असे मृताचे नाव आहे. कमलच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्याचा भाऊ समीप कुमपूर गावात सुभाष यादव यांच्या दारूच्या दुकानात काम करत होता. पाच महिन्यांपासून त्याला पगार दिला नव्हता. पगार मागण्यासाठी कमल सुभाष यादव यांच्याकडे गेला. तेव्हा सुभाष यादव त्याला घेऊन दारूच्या अड्ड्यावर गेले आणि त्यांनी पेट्रोल टाकून जिवंत जाळले, असा आरोप कमल किशोरच्या भावाने केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून खैरथल सैटेलाइट रुग्णालयात मृतदेह नेला. तसेच ठेकेदाराला अटक करण्याची मागणी कुटुंबीयानी केली आहे.

दारू दुकानात सेल्समन जळून ठार

पहिल्यांदा दुकानात झोपला होता कमलकिशोर

कमल किशोर सुमारे 5 महिन्यांपासून दुकानात सेल्समन म्हणून काम करत होता. तो पहिल्यांदाच रात्री दुकानावर थांबला. त्याचे मागील पैसेही थकबाकी होते. दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या छिद्रातून पेट्रोल किंवा अल्कोहोलची फवारणी करून ही आग लागल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. आग पसरल्यानंतर त्याचा भाऊ आपला जीव वाचविण्यासाठी फ्रिजमध्ये लपला. तिथेच त्याचा मृत्यू झाला, असे किशोरच्या भावाने तक्रारीत म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details