लखनौ - भाजप आमदार राजेश मिश्रा उर्फ पप्पू भरतौल यांची मुलगी साक्षी मिश्रा आणि त्यांचे पती अजितेश यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. त्यांचे लग्न वैध असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. तसेच, या जोडप्याला संरक्षण देण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. दरम्यान, साक्षी आणि अजितेश यांच्या वकिलाने साक्षीचे पती अजितेश यांना न्यायालयाबाहेर मारहाण झाल्याचा दावा केला आहे.
साक्षी-अजितेश यांचा विवाह वैध, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्वाळा
'उच्च न्यायालयाने या जोडप्याला संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, न्यायालयाबाहेर एकट्या अजितेशला मारहाण करण्यात आली. मारहाण करणारे कोण होते, हे माहीत नाही. मात्र, यावरून त्यांच्या जिवाला धोका असल्याचे सिद्ध होत आहे,' असे या जोडप्याच्या वकिलांनी पत्रकारांना सांगितले.
'उच्च न्यायालयाने या जोडप्याला संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, न्यायालयाबाहेर एकट्या अजितेशला मारहाण करण्यात आली. मारहाण करणारे कोण होते, हे माहीत नाही. मात्र, यावरून त्यांच्या जिवाला धोका असल्याचे सिद्ध होत आहे. यामुळे त्यांनी संरक्षणाची मागणी केली आहे,' असे या जोडप्याच्या वकिलांनी पत्रकारांना सांगितले.
भाजप आमदार राजेश मिश्रा हे उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील बिथरी चैनपूर जागेवरून निवडून आले आहेत. त्यांची मुलगी साक्षी हिने आंतरजातीय विवाह केल्यानंतर आमदार मिश्रा यांनी या विवाहाला विरोध केला होता. साक्षी सवर्ण समाजातील असून त्यांचे पती अजितेश कुमार दलित कुटुंबातील आहेत.