महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

वापीचा सकल मराठा समाज महाराष्टातील पूरग्रस्तांच्या मदतीला... - पूरग्रस्त

गुजरातच्या वापी शहरातील सकल मराठा समाजाने सोमवारी त्यांच्यातर्फे कोल्हापूर, सांगलीतल्या पूरग्रस्त भागातील बेघर झालेल्या कुटुंबांकरिता मदत स्वरुपात दाळ, तांदुळ, कपडे, औषधी, साबन, टुथपेस्ट, बिस्कीटं इत्यादी साहित्य पाठवले आहे. तर, त्यांच्यातर्फे केलेल्या या मदतीनंतर आणखी काही हात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहे.

मदत

By

Published : Aug 28, 2019, 12:23 AM IST

वापी -महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील कोल्हापूर, सांगली येथे आलेल्या महापुरात मोठं नुकसान झाले. अनेकांची घरे वाहून गेली, जनजीवन विस्कळीत झाले असून त्यांची परिस्थिती अजूनही सावरलेली नाही. यातच या पूरग्रस्तांच्या मदतीला आता गुजरातच्या वलसाड जिल्ह्याच्या वापी शहरातील सकल मराठा समाज पुढे आला आहे. त्यांनी वापी येथून पूरग्रस्त भागाला जीवनोपयोगी वस्तूंचा पुरवठा केला आहे.

वापीचा सकल मराठा समाज महाराष्टातील पूरग्रस्तांच्या मदतीला...


गुजरातच्या वापीत वसलेल्या सकल मराठा समाजाने सोमवारी त्यांच्यातर्फे कोल्हापूर, सांगलीतल्या पूरग्रस्त भागातील बेघर झालेल्या कुटुंबांकरिता मदत स्वरुपात दाळ, तांदुळ, कपडे, औषधी, साबन, टुथपेस्ट, बिस्कीटं इत्यादी साहित्य पाठवले आहे. तर, त्यांच्यातर्फे केलेल्या या मदतीचे सध्या कौतूक होत असून यानंतर आणखी काही हात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहे.


ही मदत महाराष्ट्रात आलेल्या पुरात आपलं सर्वस्व गमावून बसलेल्या लोकांसाठी आहे. या मदत साहित्याचा टेम्पो घेवून सकल मराठा समाजाचे २० तरूण महाराष्ट्रात जाणार आहेत. विशेष म्हणजे, आधी सेलवास येथूनही पूरग्रस्तांसाठी मदतीच्या स्वरूपात आवश्यक साहित्यांनी भरलेला ट्रक महाराष्ट्रात पाठवला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details