नवी दिल्ली -भोपाळच्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना मध्यप्रदेशातील काँग्रेस आमदार गोवर्धन दांगी यांनी जिवंत जाळण्याची धमकी दिली होती. त्यावर 8 डिसेंबरला ब्यावरा येथे मी येत असून मला जाळून टाकावे, असे प्रज्ञा ठाकूरने प्रत्युत्तर दिले आहे.
मी येतेय... मला जाळून टाका, प्रज्ञा ठाकूरचे काँग्रेसच्या नेत्याला आव्हान - Congress MLA Govardhan Dangi controversial statement
भोपाळच्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना मध्यप्रदेशातील काँग्रेस आमदार गोवर्धन दांगी यांनी जिवंत जाळण्याची धमकी दिली होती. त्यावर प्रज्ञा यांनी मला जाळून टाका, असे प्रत्युतर दिले.

नैना साहनीला तंदूरमध्ये आणि 1984 मधील शिखविरोधी दंगलीमध्ये लोकांना जिवंत जाळण्याचा अनुभव काँग्रेसला आहेच. राहुल गांधी यांनी मला दहशतवादी संबोधले. त्यानंतर त्यांच्या नेत्याने मला जाळण्याची धमकी दिली. त्यामुळे मी दांगी यांचे निवासस्थान असलेल्या ब्यावरा येथे 8 डिसेंबरला येत आहे. त्यांनी मला जाळून टाकावे, असे आव्हान प्रज्ञा यांनी दांगींना दिले आहे.
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याला देशभक्त म्हटल्यामुळे भाजप नेत्या प्रज्ञा ठाकूर यांच्यावर मध्य प्रदेशमधील काँग्रेस आमदार गोवर्धन दांगी यांनी जोरदार टीका केली. प्रज्ञा ठाकूर यांनी केलेले वक्तव्य हे निंदनीय आहे. त्याच्या निषेधार्थ आम्ही केवळ त्यांचा पुतळाच नाही, तर मध्य प्रदेशमध्ये जर त्यांनी पाऊल ठेवले, तर त्यांनाही आम्ही जाळू असे ते म्हणाले होते.