खासदार झालेय ते गटारे आणि शौचालये साफ करण्यासाठी नाही - साध्वी प्रज्ञा
त्यांच्या या वक्तव्यानंतर समर्थकांनी टाळ्याही वाजवल्या. त्यांनी या बोलण्याने एक प्रकारे 'स्वच्छ भारत' अभियानाची खिल्ली उडवली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन संताप व्यक्त होत आहे.
भोपाळ - अनेकदा बेताल वक्तव्ये करून वाद ओढवून घेणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आता आणखी एका वक्तव्याची भर टाकली आहे. सोहोर येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी चक्क 'मी खासदार झालेय ते गटारे आणि शौचालये साफ करण्यासाठी नाही,' असे वक्तव्य केले आहे. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी टाळ्याही वाजवल्या. त्यांनी या बोलण्याने एक प्रकारे 'स्वच्छ भारत' अभियानाची खिल्ली उडवली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन संताप व्यक्त होत आहे.
'मी खासदार झालेय, ते गटारे आणि शौचालये साफ करण्यासाठी नाही. आम्हाला वेगळ्या कामासाठी निवडून देण्यात आले आहे. ते काम आम्ही प्रामाणिकपणे करू,' असे ठाकूर यांनी म्हटले आहे. नागरिकांशी संवाद साधत असताना त्यांच्या आवाजातून अरेरावी जाणवत असल्याने त्यांची ही बोलण्याची पद्धत अनेकांना खटकली आहे. त्यांच्या डोक्यात खासदारकीची हवा गेल्याचीही चर्चा आहे. तसेच, त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. या वक्तव्यामुळे त्या पुन्हा एकदा अडचणीत येऊ शकतात.