भोपाळ - मालेगाव बॉम्बस्फोटात आरोपी राहिलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी बुधवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांना भोपाळमधून उमेदवारी दिली गेली आहे. प्रज्ञा सिंह यांनी आज औपचारिकरीत्या भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. त्यांच्याकडे कट्टर हिंदुत्ववादी म्हणून पाहिले जाते. त्यांची लढत काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध होणार आहे.
साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या भोपाळमधून लढण्यावर शिक्कामोर्तब, दिग्विजय सिंहांविरुद्ध होणार लढत
'मी निवडणूक लढवणार आणि जिंकणार सुद्धा,' असे साध्वी प्रज्ञा सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्या बुधवारी सकाळी भोपाळमधील भाजप कार्यालयात आल्या होत्या. तेथे भाजप नेते शिवराज सिंह चौहान, राम लाल आणि प्रभात झा हेही उपस्थित होते.
'मी निवडणूक लढवणार आणि जिंकणार सुद्धा,' असे साध्वी प्रज्ञा सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्या बुधवारी सकाळी भोपाळमधील भाजप कार्यालयात आल्या होत्या. तेथे भाजप नेते शिवराज सिंह चौहान, राम लाल आणि प्रभात झा हेही उपस्थित होते. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर साध्वींनी भाजपामध्ये प्रवेश केला. भोपाळच्या जागेसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे.
मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभरावाचा सामना करावा लागला आहे. तरीही, भोपाळ मतदारसंघावर भाजपची पकड असल्याचे म्हटले जाते. येथे २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार आलोक सांजर यांना ७.१४ लाख मते मिळाली होती. मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी एका मशिदीबाहेर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा आरोपी होत्या. या प्रकरणात राष्ट्रीय तपास न्यायालयाने त्यांची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे.