भोपाळ - भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'भाजपच्या अनेक नेत्यांचे एकामागे एक मृत्यू होत आहेत. यामागे 'विरोधी पक्ष काळ्या मारक शक्तींचा वापर करत आहेत,' हे एक कारण आहे, असे साध्वींनी म्हटले आहे. त्या भाजपच्या प्रदेश कार्यालयात आयोजित दिवंगत बाबूलाल गौर आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या श्रद्धांजली सभेदरम्यान बोलत होत्या.
विरोधकांच्या काळ्या जादूमुळेच भाजप नेत्यांचे मृत्यू; प्रज्ञा सिंह बरळल्या - साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर
'लोकसभा निवडणूक लढवत असताना एका महाराजांनी विरोधी पक्ष मारक शक्तीचा प्रयोग करत असल्याचे सांगितले होते,' असेही प्रज्ञा सिंह यांनी म्हटले आहे.
'लोकसभा निवडणूक लढवत असताना एका महाराजांनी विरोधी पक्ष मारक शक्तीचा प्रयोग करत असल्याचे सांगितले होते,' असेही प्रज्ञा सिंह यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षाद्वारे भाजप नेत्यांवर मारक शक्तीचा वापर केला जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. 'आमच्या नेत्यांचे अकाली निधन होत आहे. ही बाब संशय निर्माण करणारी आहे. विरोधी पक्षांनी मारक शक्तींचा वापर केला आहे,' असे साध्वी म्हणाल्या. 'मी लोकसभा निवडणूक लढवत असताना एका महाराजांनी हे सांगितले. तसेच, त्यांनी खूप वाईट काळ सुरू असल्याचेही म्हटले होते,' असे त्या म्हणाल्या.
'विरोधी पक्ष तुमच्या आणि तुमच्या पक्षातील लोकांविरोधात एका मारक शक्तीचा वापर करत आहे. तुम्ही सर्वजण सावध रहा. तुमची साधना वाढवा. खरं तर मी ही गोष्ट विसरून गेले होते. मात्र, आता आमच्या पक्षातील नेते एकामागून एक जात असल्याचे दिसत आहे. आता मला त्या महाराजांच्या शब्दांची आठवण होते. भलेही तुम्ही विश्वास ठेवणार नाही. पण हे खरे आहे आणि असेच होत आहे,' असे वक्तव्य साध्वींनी