हरिद्वार- निकिता हत्याप्रकरणी संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. या प्रकरणाला लव जिहादशी देखील जोडले जात आहे. अशातच विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची आणि काही हिंदू संघटनांनी चंद्राचार्य चौकात धर्म परिवर्तन विरोधात जोरदार निषेध नोंदवला. तसेच, सरकराने लव जिहाद विरोधात कठोर कायदा बनवण्याची मागणी केली. यावेळी साध्वी प्राची यांनी लव्ह जिहाद प्रकरणी काँग्रेसवर गंभीर आरोपही लावले.
देशात लव्ह जिहादाच्या घटनांनी काही भागात कळस गाठला आहे. यात मुलींना फूस लावून त्यांचे धर्म परिवर्तन केले जाते. जर कुण्या मुलीने नकार दिला तर तिला ठार मारले जाते. त्यामुळे, निकितासारख्या अन्य मुली याला बळी पडू नये यासाठी सरकारने लव्ह जिहादविरोधात कठोर कायदा बनवावा, अशी मागणी साध्वी प्राची यांनी केली.