महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तरप्रदेशमध्ये आणखी एका साधूची हत्या.. गेल्या चार महिन्यांतील पाचवी घटना - बरेली साधू हत्या

उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एका साधूची हत्या करण्यात आली आहे. जिल्ह्यातील हल्दी कला गावातील नागा बाबा मंदिरातील पुजाऱ्याला जबर मारहाण करत त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांना या साधूचा मृतदेह गावाबाहेरील झुडुपांमध्ये आढळून आला.

sadhu beaten to death
बरेलीमध्ये साधूला मारहाण करत हत्या; गेल्या चार महिन्यांतील पाचवी घटना..

By

Published : Jul 21, 2020, 9:23 PM IST

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एका साधूची हत्या करण्यात आली आहे. जिल्ह्यातील हल्दी कला गावातील नागा बाबा मंदिरातील पुजाऱ्याला जबर मारहाण करत त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांना या साधूचा मृतदेह गावाबाहेरील झुडुपांमध्ये आढळून आला. या मंदीरात ते गेल्या २५ वर्षांपासून राहत होते, अशी माहिती समोर आली आहे.

शनिवारी रात्री पोलीस, लष्कर आणि पीएसीची तयारी करत असणारे काही तरुण गावाबाहेर धावण्याचा सराव करत होते. तेव्हा तिथे साधूची कोणासोबत तरी वादावादी होत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर त्यांनी गावकऱ्यांना याबाबत माहिती दिली. जेव्हा गावकरी त्याठिकाणी पोहोचले, तेव्हा तिथे साधू नव्हते. त्यानंतर गावकऱ्यांनी आजूबाजूला त्यांचा शोध घ्यायला सुरू केले. तसेच या घटनेची माहिती पोलिसांनाही देण्यात आली.

बरेलीमध्ये साधूला मारहाण करत हत्या; गेल्या चार महिन्यांतील पाचवी घटना..

पोलीस आल्यानंतर त्यांना झुडुपांमध्ये साधूचा मृतदेह आढळला. त्यांच्या शरीरावर जखमा होत्या. तसेच, शवविच्छेदन अहवालानुसार, त्यांच्या बरगड्यांना इजा झाल्याचे, तसेच डोक्यालाही मार लागल्याचे समोर आले. ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी याबाबत हत्येचा गुन्हा दाखल करत, आरोपींचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा :धक्कादायक! जादूटोणा करत असल्याच्या संशयावरुन वृद्ध दाम्पत्याला जिवंत जाळले..

ABOUT THE AUTHOR

...view details