चंदिगड -बीएसएफचे माजी जवान तेज बहादुर यादव यांनी शनिवारी जेजेपी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. मात्र पक्ष सोडताना त्यांनी जननायक जनता पार्टीने (जेजेपी) भारतीय जनता पक्षाला हरियाणात सरकार स्थापनेसाठी पाठिंबा दर्शवत मतदारांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.
हेही वाचा... हरियाणा सरकारचा आज शपथविधी, भाजप-जेजेपी स्थापन करणार सरकार
तेज बहादूर यादव यांनी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याविरुद्ध कर्नाल मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी जेजेपीमध्ये प्रवेश केला होता. निवडणुकीत ते ३१७५ मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहिले. मात्र या निवडणूकीत जेजेपीला 10 जागा मिळाल्या. यामुळे सत्ता समिकरणात जेजेपीने भाजपला पाठिंबा दिला.
हेही वाचा... कलम ३७० : 'जम्मू-काश्मीरमधील नागरिकांसाठी ही दिवाळी खास'
‘तुम्ही भाजपशी समझोता केला, तर मी पक्ष सोडेन असे मी पक्षाच्या नेत्यांना सांगितले होते’, तसेच जेजेपी ही भाजपची ‘बी टीम’ असल्याचे आता स्पष्ट झाले आहे, असे सांगून यादव यांनी भाजपला पाठिंबा दिल्याबद्दल दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वाखालील जननायक जनता पार्टीवर टीका केली. आणि अखेर पक्षाला रामराम ठोकला. हरियाणात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला पाठिंबा देऊन जननायक जनता पार्टीने मतदारांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप त्यांनी केला.
हेही वाचा... दुष्यंत चौटाला यांच्या वडिलांना मोठा दिलासा, दोन आठवड्यांसाठी तुरुंगातून येणार बाहेर
कोण आहे तेज बहादुर यादव ?
भारताच्या सीमा सुरक्षा जवानांच्या सैनिकांना दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या दर्जाबद्दल तक्रार करणारी चित्रफीत समाजमाध्यमांवर टाकल्यानंतर यादव यांना २०१७ साली बीएसएफमधून बडतर्फ करण्यात आले होते.