लखनौ -वाराणसी येथून उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर बीएसएफचे बडतर्फ उमेदवार तेज बहादुर यादव यांनी निवडणूक आयोगाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ते पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढणार होते. मात्र, बीएसएफने बडतर्फ केल्याचे स्पष्टीकरण मागणारे प्रतिज्ञापत्र त्यांनी मुदतपूर्व न दिल्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती.
लोकसभा निवडणुकांच्या सातव्या टप्प्यामध्ये वाराणसी येथे मतदान होणार आहे. येथून पतंप्रधान मोदी दुसऱ्यांदा रिंगणात आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष येथील मतदान प्रक्रियेवर लागले आहे. येथून तेज बहादुर यादव यांनी सपा-बसप आघाडीच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांना बडतर्फ केल्याचे कारण स्पष्ट करणारे बीएसएफचे शपथपत्र २४ तासांच्या आत दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते.