जयपूर - राजस्थानमध्ये बंडाची भूमिका घेऊन आपल्याच सरकारला आव्हान देणारे सचिन पायलट यांच्यावर काँग्रेसने मोठी कारवाई केली आहे. काँग्रेसने सचिन पायलट यांना प्रदेशाध्यक्षपदाबरोबरच उपमुख्यमंत्रीपदावरून हटवले आहे. याबाबतची माहिती काँग्रेसचे नेते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी दिली आहे.
राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी) पुन्हा काँग्रेस आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत सचिन पालट यांच्यावर मोठी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार त्यांना प्रदेशाध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री या दोन्ही पदांवरून हटविण्यात आले. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी याबाबतची माहिती दिली.
सचिन पायलट यांच्यासह तीन मंत्र्यांना पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांनतर पायलट यांनी ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी लिहिले आहे की, 'सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं.'