महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काँग्रेस विधिमंडळ बैठकीसाठी सचिन पायलट मुख्यमंत्री निवासस्थानी, सत्ता संघर्षानंतर पहिलीच भेट

उद्या(गुरुवार) काँग्रेस विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे. दरम्यान, भाजपने अविश्वासदर्शक ठराव मांडण्याचे जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ नेत्यांची बैठक घेण्यात येत आहे.

FILE PIC
संग्रहित छायाचित्र

By

Published : Aug 13, 2020, 5:32 PM IST

जयपूर - काँग्रेस नेते सचिन पायलट मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले आहेत. आज(गुरुवार) काँग्रेसच्या आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी सचिन पायलट आले आहेत. मागील काही दिवसांपासून गेहलोत आणि पायलट यांच्यामध्ये वाद सुरु आहेत. मात्र, काँग्रेस पक्ष नेतृत्त्वाने हस्तक्षेप केल्यामुळे वाद मिटण्याची चिन्हे दिसत आहे. वाद सुरु झाल्यानंतर दोघा नेत्यांची ही पहिलीच भेट आहे.

उद्या काँग्रेस विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे. दरम्यान, भाजपने अविश्वासदर्शक ठराव मांडण्याचे जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने विधिमंडळ नेत्यांची बैठक बोलावली आहे.

बंडखोर आमदार आणि गेहलोत यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांमध्ये समेट घडवून आणण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र, मुख्यमंत्री गेहलोत कोणत्याही प्रकारचा धोका स्वीकारण्यास तयार नाहीत. विश्वासदर्शक ठरावाची कोणी विषय काढो अगर नाही. काँग्रेसने विश्वासदर्शक ठराव आणण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्या(शुक्रवार) विश्वासदर्शक ठराव झाल्यानंतर १५ ऑगस्टपासून आमदारांनाही मोकळे सोडण्यात येईल. मागील काही दिवसांपासून भाजप सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हणत, काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना सुरक्षेत ठेवले आहे. एकदा विश्वासदर्शक ठराव झाल्यानंतर आमदारांना मोकळे सोडण्यात येईल. दरम्यान, अविश्वासदर्शक ठराव मांडणार असल्याचे भाजपने जाहीर केले आहे. त्यामुळे राजस्थानात सध्या मतांची जुळवाजुळव सुरु आहे. एकदा विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर पुढील सहा महिने विश्वासदर्शक ठराव मांडता येत नाही. त्यामुळे सहा महिने तरी राजस्थानातील सत्तासंघर्ष निवळेल.

ABOUT THE AUTHOR

...view details