महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मी पुन्हा येईन..मी पुन्हा येईन - तृप्ती देसाई

तृप्ती देसाई काल (मंगळवार) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास केरळमध्ये दाखल झाल्या होत्या. कोचिन विमानतळावरून त्यांनी थेट कोची पोलीस आयुक्तालय गाठत सुरक्षेची मागणी केली होती. तेव्हा भाजप आणि शबरीमलाच्या भक्तांनी तृप्ती देसाई यांच्याविरोधात आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनी देसाई यांना सुरक्षा देण्यास नकार दिला. भक्तांनी पोलीस आयुक्तालयासमोर देसाई यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

sabarimala temple : Activist Trupti Desai cancels plan to visit Sabarimala
मी पुन्हा येईन..मी पुन्ही येईन - तृप्ती देसाई

By

Published : Nov 27, 2019, 11:38 AM IST

Updated : Nov 27, 2019, 12:28 PM IST

कोची - शबरीमला मंदिरात प्रवेशाचा निर्धार करून कोचीला पोहोचलेल्या भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांना सुरक्षेअभावी माघारी परतावे लागले. केरळ पोलिसांनी देसाई यांना सुरक्षा देण्यास नकार दिला. यामुळे देसाई यांनी ३ तासांच्या प्रतीक्षेनंतर आपल्या महिला कार्यकर्त्यांसह मागे परतण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, त्यांनी मी पुन्हा शबरीमलाला येणार असल्याचे बोलून दाखवले.

तृप्ती देसाई काल (मंगळवार) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास केरळमध्ये दाखल झाल्या होत्या. कोचिन विमानतळावरून त्यांनी थेट कोची पोलीस आयुक्तालय गाठत सुरक्षेची मागणी केली होती. तेव्हा भाजप आणि शबरीमलाच्या भक्तांनी तृप्ती देसाई यांच्याविरोधात आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनी देसाई यांना सुरक्षा देण्यास नकार दिला. भक्तांनी पोलीस आयुक्तालयासमोर देसाई यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी परिसरात तणाव निर्माण झाला होता.

तृप्ती देसाई केरळमध्ये बोलताना...

याविषयी बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या, 'संविधान दिनाच्या दिवशी आम्हाला न्याय मिळाला नाही. पोलिसांनी आम्हाला सुरक्षा देण्यास नकार दिला. उलट पोलिसांनीच शबरीमलाला जाऊ, नये असा सल्ला दिला. यामुळे आम्ही माघारी जात आहोत.'

दरम्यान, तृप्ती देसाई यांनी शबरीमला दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग केले होते. बुकिंग केलेला ई-मेल त्यांनी मुख्यमंत्री आणि डीजीपींना पाठवला होता. मात्र, केरळ सरकारसह पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरवली नाही.

हेही वाचा -'पीएसएलव्ही - सी ४७' यानाचे यशस्वी प्रक्षेपण; 'कॅर्टोसॅट-३'सह सर्व १४ उपग्रह त्याच्या कक्षेत दाखल!

हेही वाचा -केवळ फडणवीसच नाहीत, तर 'हे' आहेत देशभरातील 'औटघटके'चे ठरलेले मुख्यमंत्री

Last Updated : Nov 27, 2019, 12:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details