महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हैदराबाद : उष्माघाताने रशियन नागरिकाचा मृत्यू - citizen

अलेक्झांडर हे हैदराबादमधील गचीबाऊली येथे राहिले होते. बुधवारी त्यांना अत्यवस्थ वाटत असल्याने त्यांच्यावर गांधी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते.

हैदराबाद : उष्माघाताने रशियन नागरिकाचा मृत्यू

By

Published : May 16, 2019, 10:14 PM IST

हैदराबाद - एका रशियन नागरिकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना हैदराबाद येथे घडली. अलेक्झांडर असे या ३८ वर्षीय रशियन नागरिकाचे नाव असून ते प्रवासी व्हिसावर भारतात आले होते.

अलेक्झांडर हे हैदराबादमधील गाचीबाऊली येथे राहिले होते. बुधवारी त्यांना अत्यवस्थ वाटत असल्याने त्यांच्यावर गांधी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते.

तेलंगाणाच्या उत्तर व पूर्व भागात पुढिल चार ते पाच दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. राज्यातल्या बहुतांश भागात ४२ ते ४५ डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान राहणार असल्याची शक्यता हैदराबादच्या हवामान विभागाने वर्तवली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details