मनाली(हिमाचल प्रदेश) - नागपूरचा धावपटू कायरेन डिसूजा याने मनालीतील १३ हजार फूट उंट हामटा आणि रोहतांग पर्वतांमधील दरी १९ तासात पार करून नवीन विक्रम केला आहे. डिसूजाने रात्री १२ वाजता मनालीहून धावायला सुरुवात केली होती. सकाळी डिसूजा १३ हजार फूट उंच हामटा पर्वतावर पोहोचला. त्यानंतर हामटाहून पूर्ण दिवस धावत रोहतांग पार करून रविवारी संध्याकाळी डिसूजा मनालीत पोहोचला. मनालीत उपविभागीय दंडाधिकारी रमन घरसंगी यांनी डिसूजाचे स्वागत केले. दरम्यान, हा विक्रम करताना डिसूजाची टीम मदतीला त्यांच्यासोबत होती.
तेथील स्थानिक ही दरी पार करण्यासाठी किमान चार दिवस घेतात. मात्र, डिसूजाने केवळ १९ तासात १२६ किलोमीटर लांब रूट पूर्ण केला. हा विक्रम करण्यासाठी डिसूजाने यापूर्वीदेखील हा पर्वत पार केला होता. हामटा आणि रोहतांग पर्वत १३ फूटांपेक्षा जास्त उंच आहेत. ट्रिपल ट्रबल रन नावाचा हा कार्यक्रम फॉर प्ले मीडिया मनाली यांच्याकडून आयोजित करण्यात आला होता. यामध्ये मनाली प्रशासनासहीत अटलबिहारी वाजपेयी पर्वतारोहण आणि क्रीडा संस्थेने मदत केली.
टीमचे सदस्य प्रशांत भट्ट, आदित्य विक्रम पांडे, मोहित शर्मा, उत्कर्ष मित्तल, अभिलाष महाजन, राहुल रावत, क्षितिज गुप्ता व शुक्ला गुप्ता यांनी सांगितले की रात्री १२ वाजता डिसूजाने मनालीहून धावायला सुरुवात केली आणि अलेउ, प्रीणी, सेथन या मार्गावरून तो जोत याठिकाणी पोहोचला.