आरएसएस ही भारतामधील दहशतवादी संघटना, डॉ. आंबेडकरांच्या पणतूचा हल्लाबोल - Rajaratna Ambedkar news
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) जोरदार हल्लाबोल केला आहे.
राजरत्न आंबेडकर
नवी दिल्ली - भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही भारतामधील दहशतवादी संघटना असल्याचे त्यांनी म्हटले. कर्नाटकमध्ये प्रजासत्ताक दिनानिम्मित आयोजित सभेत ते बोलत होते.