महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गायींची सेवा केल्याने कैद्यांमधली गुन्हेगारी प्रवृत्ती कमी होते - मोहन भागवत - Cow rearing decreased 'criminal mindset' in prisoners

गायींची सेवा केल्यामुळे कैद्यांमध्ये झपाट्याने सुधारणा होते आणि त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती कमी होते, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत  यांनी केले आहे.

मोहन भागवत
मोहन भागवत

By

Published : Dec 8, 2019, 11:53 AM IST

नवी दिल्ली - गायींची सेवा केल्यामुळे कैद्यांमध्ये झपाट्याने सुधारणा होते आणि त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती कमी होते, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे. पुण्यात आयोजित गो-विज्ञान संशोधन संस्थेच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.


तुरुंगामध्ये गो-सेवा सुरू करण्यात आली आहे. कैद्यांना त्यांची देखभाल करण्याचे काम दिले जाते. जे कैदी गायींची सेवा करतात. त्या कैद्यांमधली गुन्हेगारी प्रवृत्ती कमी होत आहे. यासंबधीत अनुभव तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याचे ते म्हणाले.


मोहन भागवत यांनी गायीच्या महत्वाची पारंपरिक आणि वैज्ञानिक सांगड घातली. गाय निसर्गावर, मातीवर, मनुष्यावर आणि मनुष्याच्या स्वभावावर देखील परिणाम करते गाय सर्व आजारांपासून वाचवते. गाय आपली माता असून आपण गायीचे संरक्षक बनले पाहिजे, असे मत भागवत यांनी मांडले.

ABOUT THE AUTHOR

...view details