महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याची प्रेम प्रकरणातून गळा दाबून हत्या - मुझफ्फरनगर आरएसएस कार्यकर्त्याची हत्या

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पंकज यांचा मृतदेह खड्ड्यात पुरलेला आढळून आला आहे. मृताच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केलेले दिसून येत होते. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याची प्रेम प्रकरणातून गळा दाबून हत्या

By

Published : Sep 16, 2019, 2:10 PM IST

मुझफ्फरनगर -एका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या( आरएसएस) कार्यकर्त्याची प्रेम प्रकरणातून गळा दाबून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पंकज यांचा मृतदेह खड्ड्यात पुरलेला आढळून आला आहे. मृताच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केलेले दिसून येत होते. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

अभिषेक यादव, एसएसपी, मुज़फ्फरनगर

हेही वाचा -अखिलेश यादवांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांचा गोंधळ, दोन जखमी

हे प्रकरण तितावी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या करवडा गावातील आहे. शुक्रवारी संध्याकाळी आरएसएस कार्यकर्ता पंकज संशयास्पद पद्धतीने बेपत्ता झाले होते. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पंकज यांचा शोध घोतला. मात्र, त्यांना यश आले नाही. संध्याकाळी ग्रामस्थांनी शेतातील खड्ड्यात काहीतरी पुरलेले असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून खड्डा खोदला असता, त्यांना पंकज यांचा मृतदेह आढळला.

मृतक पंकजचे घरासमोरच्या तरुणीसोबत अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तिच्या भावांनीच पंकजला मारले, असा आरोप पंकजच्या कुटुंबीयांनी केला आहे. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुलीचा भाऊ आणि वडिलांना अटक केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details