महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

महाराष्ट्रात महायुतीच्या सत्तेत आम्हाला कॅबिनेट पद हवं; आठवलेंची मागणी - ramdas athawale jharkhand

रिपब्लिकन पक्ष ५ जागांवरून निवडणूक लढवली होती. त्यातील २ जागांवर आम्हाला विजय मिळाला आहे. महाराष्ट्रात युतीला २०० च्या वर जागा मिळण्याची अपेक्षा होती. तसे झाले नाही मात्र, भाजप आणि शिवसेनेचे सरकार आले असून भाजपचा मुख्यमंत्री असेल. तसेच आमच्या पक्षाच्या जिंकलेल्या उमेदवारांसाठी एक राज्यमंत्री पद आणि एक कॅबिनेट पद देण्यात यावे

रामदास आठवले

By

Published : Oct 25, 2019, 5:30 PM IST

रांची - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे झारखंड दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत झारखंडमध्ये पक्षाला आणखी सबळ करण्यासाठीच्या धोरणांवर चर्चा केली. तसेच झारखंड येथील आगामी विधानसभा निवडणुकात रिपब्लिकन पक्षातर्फे ३ ते ४ जागांवर निवडणूक लढवण्यासाठी एनडीएकडे मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. याकरिता आठवले झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच जर या मुद्द्यावर दास यांच्याकडून नकार आला आणि युती नाही झाली तर, पक्ष काही जागांवर निवडणूक लढवणार आणि उर्वरित जागांवर भाजपचे समर्थन करणार असल्याचे आठवले म्हणाले.

रामदास आठवले पत्रकारांशी बोलताना

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या लागलेल्या निकालाबाबत बोलताना आठवले म्हणाले, रिपब्लिकन पक्ष ५ जागांवरून निवडणूक लढवली होती. त्यातील २ जागांवर आम्हाला विजय मिळाला आहे. महाराष्ट्रात युतीला २०० च्या वर जागा मिळण्याची अपेक्षा होती. तसे झाले नाही मात्र, भाजप आणि शिवसेनेचे सरकार आले असून भाजपचा मुख्यमंत्री असेल. तसेच आमच्या पक्षाच्या जिंकलेल्या उमेदवारांसाठी एक राज्यमंत्री पद आणि एक कॅबिनेट पद देण्यात यावे ,अशी मागणी असल्याचेही आठवले म्हणाले. सोबतच त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले. मोदी हे आजघडीला सर्वात लोकप्रिय पंतप्रधान आहेत. जनतेला त्यांच्यावर आणि भाजपवर विश्वास असल्याचे मत आठवले यांनी यावेळी व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details