हैदराबाद - रेल्वे पोलीस दलाच्या एका जवानाने प्रसंगावधान राखत एका प्रवाशाचा जीव वाचवल्याची घटना घडली आहे. विकूल कुमार असे या जिगरबाज जवानाचे नाव आहे.
...आणि त्याने प्रवाशाला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले, थरार सीसीटीव्हीमध्ये कैद! - विकुल कुमार
रेल्वे पोलीस दलाच्या एका जवानाने प्रसंगावधान राखत एका प्रवाशाचा जीव वाचवल्याची घटना घडली आहे. विकूल कुमार असे या जिगरबाज जवानाचे नाव आहे.
RPF staff saved mans life in Hyderabad
हैदराबादमधील रेल्वे स्थानकावर सकाळी साडेआठच्या दरम्यान चारमिनार एक्सप्रेस आली होती. त्या चालू गाडीतून उतरताना, टी. वेंकट रेड्डी हा प्रवासी रेल्वे आणि फलाटाच्या मध्येच अडकला. त्यावेळी विकुल यांचे लक्ष या प्रवाशाकडे गेले आणि त्यांनी प्रसंगावधान राखत, धावत जाऊन या वेंकट याला अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून खेचून बाहेर काढले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. यामध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.