रामगढ (झारखंड) - जिल्ह्यातील आरपीएफ कॉलनीत राहणाऱ्या जवानाने शेजारी राहणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याने दूध दिले नाही या क्षुल्लक कारणामुळे त्याच्या कुटुंबावरच गोळ्या झाडल्या. यात २ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ३ गंभीर जखमी आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.
दूध न दिल्याने जवानाचा शेजारी कुटुंबावर गोळीबार, दोघांचा मृत्यू - rpf
जिल्ह्यातील आरपीएफ कॉलनीत राहणाऱ्या जवानाने शेजारी राहणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याने दूध दिले नाही या क्षुल्लक कारणामुळे त्याच्या कुटुंबावरच गोळ्या झाडल्या. यात २ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ३ गंभीर जखमी आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.
मृत रेल्वे कर्मचाऱ्याच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, आरपीएफ जवान केवळ १५ दिवस आगोदरच या भागात राहायला आला होता. आरोपी पवन कुमार सिंग त्यांच्या घरी दूध नेण्यासाठी घरी आला होता. घरातल्या सदस्याने दूध नाही, असे सांगितल्याबरोबर त्याने अंधाधुंद फायरींग सुरू केली. यात त्या कुटुंबातील कर्मचारी आणि त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला असून इतर ३ जण जखमी झाले. मुलगा दुसऱ्या खालीमध्ये असल्याने तो बचावला.
रामगड पोलीस अधीक्षक प्रभात कुमार हे जखमीला भेटण्यासाठी हॉस्पीटलमध्ये भेटण्यासाठी आले, यावेळी त्यांनी सांगितले, अजून नेमके कुठले कारण आहे ज्यामुळे ही घटना घडली याबद्दल पोलिसांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पीडितांना न्याय दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. मात्र, अजुनही आरोपीला पकडण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत.
TAGGED:
zarkhand crime