महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आयआरसीटीच्या 176 एजंटसह 718 दलालांना रेल्वे सुरक्षा दलाकडून अटक

गेल्या मे महिन्यापासून आतापर्यंत तब्बल 718 दलालांना आणि आयआरसीटीसीच्या 176 अधिकृत एजंटांना रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली.

रेल्वे सुरक्षा दल
रेल्वे सुरक्षा दल

By

Published : Aug 1, 2020, 2:22 PM IST

नवी दिल्ली - रेल्वे सुरक्षा दलाकडून रेल्वे तिकीटांचा काळाबाजार आटोक्यात आणण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. गेल्या मे महिन्यापासून आतापर्यंत तब्बल 718 दलालांना आणि आयआरसीटीसीच्या 176 अधिकृत एजंटांना रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली.

भारतीय रेल्वेच्या आरपीएफच्या विविध ठाण्यात रेल्वे अधिनियम 1989 च्या कलम 143 अन्वये एकूण 717 प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. तसेच 68 लाख रुपयांची तिकीटेही जप्त केली आहेत.

अवैध कामांना आळा घालण्यासाठी आणि सर्व प्रवाश्यांसाठी रेल्वेच्या प्रवासासाठी आरक्षित तिकिटांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी असेच छापे सुरू ठेवण्याचे निर्देश आरपीएफने दिले आहेत. दलाली हालचाली शोधून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी आरपीएफचे देशव्यापी प्रयत्न सुरू असून 20 मे 2020 रोजी या मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती.

आयआरसीटीसी एजंट्स वैयक्तिक आयडीचा वापर करून तिकिटांचे आरक्षण करत होते आणि नंतर अनधिकृतपणे अधिक किंमतीला या तिकिटांची विक्री करतात. त्यांना काळ्या यादीत टाकण्यासाठी कारवाई सुरू केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details