महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'नो जॉब, नो वोट... मोदीजी रोजगार द्या'; ट्विटरवर युवक आक्रमक - रोजगार अभियान काँग्रेस

रोजगार दो या अभियानास सोशल मीडियातून प्रतिसाद मिळत असून १५ लाखांपेक्षा जास्त प्रतिक्रिया ट्विटरवर आल्या आहेत. हे अभियान ट्विटरच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये आले आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Sep 3, 2020, 5:39 PM IST

बंगळुरु - भारतीय अर्थव्यवस्था मंदीत सापडली असून एप्रिल ते जून या तिमाहीत देशाचा विकास दर उणे २३.९ टक्के नोंदवला आहे. बांधकाम, व्यापार, निर्मिती, पर्यटन, मनोरंजन यासह सर्वच क्षेत्रात मंदी आली आहे. कोरोना महामारी आणि त्यानंतर देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर अनेकांचे रोजगारही गेले आहेत. तर उद्योगधंदे अडचणीत सापडले आहेत. अर्थव्यवस्था डगमगली असतानाच विरोधी पक्ष आक्रमक झाले असून भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. सोशल मीडियावर राष्ट्रीय युवक काँग्रेसने #PMModi_RozgarDo ' पीएम मोदी रोजगार दो' हे अभियान सुरू केले आहे.

'रोजगार दो' या अभियानास सोशल मीडियातून प्रतिसाद मिळत असून १५ लाखांपेक्षा जास्त प्रतिक्रिया ट्विटरवर आल्या आहेत. हे अभियान ट्विटरच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये दाखल झाले आहे. काँग्रेसच्या युथ विंगने हे अभियान उचलून धरले असून पंतप्रधानांवर अनेक ट्विटर वापरकर्ते मिम्सही बनवत आहेत. पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय मंत्र्यांना टॅग करत ' सरकार रोजगार दो' अशी मागणी करण्यात येत आहे. देशभरात हे अभियान सुरू करण्यात आले आहे.

राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास या अभियानाचे नेतृत्व करत आहेत. तरुणांना रोजगार देण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी काँग्रेसने भाजप विरोधात आघाडी उघडली आहे.

देशाची अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी लागणार कित्येक महिने - चिदंबरम

देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्यासाठी कित्येक महिन्यांचा कालावधी लागेल, असे मत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सोमवारी व्यक्त केले. २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये जीडीपी हा घसरुन तब्बल उणे २३.९ टक्क्यांवर गेल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. त्यावर ऑनलाईन पत्रकार परिषद घेत चिदंबरम यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

'आता पकोडे तळायची वेळ आलीये'....आर्थिक मंदीवरून कपिल सिब्बल मोदींवर बरसले

काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान मोदींना ट्विट करून प्रश्न विचारला आहे. 'जीडीपी उणे २३.९ टक्के. मोदींजी तुम्हाला आठवतयं का? 'अच्छे दिन', सब का साथ सबका विकास, तुम्ही काँग्रेला साठ वर्ष दिली मला फक्त ६० महिने द्या, आता पकोडे तळायची वेळ आली आहे, ते सुद्धा विकले जाणार नाहीत. फक्त भाषण आणि झिरो शासन' असे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.

रोजगार दो अभियानाला पाठिंबा देणारी काही ट्विट

आम्ही तरूण रोजगार मिळविण्यासाठी झटत आहोत. रोजगार नाही तर मत नाही. २०२४ साली भाजप सत्तेत येणार नाही, याची आम्ही खात्री करू. अर्थव्यवस्थाही तुमच्यासारखीच झाली आहे, असे म्हणत मोदींचा तोल गेल्याचा फोटो एका ट्विटरकर्त्याने शेअर केला आहे.

उठा जागे व्हा, जोपर्यंत व्यवस्था नीट होत नाही, तोपर्यंत थांबू नका. तुम्हाला तुमचा आवाज स्वत: उठवावा लागणार आहे. नाहीतर कोणीही तुमचं ऐकून घेणार नाही.

खोट्या गप्पा मारणारे पंतप्रधान... वर्षाला दोन कोटी रोजगार कोठे आहेत. तुम्ही फक्त ड्रामा करू शकता. आता जीडीपी उणे २३.९ टक्के झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details